सांगली शंभर फुटी रस्त्यावर पुन्हा पडले भले मोठे भगदाड..

सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भगदाड पडण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. राजश्री शाहू महाराज मार्ग रस्त्यावर दिगंबर मेडिकल जवळ पुन्हा वीस फुटांचे भगदाड पडले आहे, त्यामुळे त्या रस्त्याची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. सांगलीतील मुख्य रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून भले मोठे भगदाड पडत आहेत. एकाची दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्याने आणखी मोठे भगदाड पडू लागले आहे. सहा महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला पण या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी अभियान त्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिला होत्या त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे रस्त्यावर तिसरा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागात केवळ टक्केवारीचा बाजार सुरू आहे आतापर्यंत महापालिका क्षेत्रात सहा भगदाड पडली आहेत याचा निषेध लोकहित मंचच्या वतीने करण्यात आला.