आधीच कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या चौघा बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता पकडला असताना आता महायुतीशी संलग्न जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आणि नव्याने स्थापन झालेल्या राजर्षी शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर या तिन्ही साखर सम्राट माजी मंत्र्यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याने हा गुंता सोडवणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरचे कडवे आव्हान असणार आहे.