इचलकरंजी शहरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा जगजाहीर आहेच. अशातच अनेक नेते मंडळींनी इचलकरंजीच्या पाणीप्रश्न याबाबतीत अनेक आव्हाने देखील दिलेली होती.इचलकरंजी शहराचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्यावर्षी १६ ऑगस्ट २०२३ रोजी राजीव गांधी भवन येथे झालेल्या सर्वपक्षीय व्यापक मेळाव्यापासून आजअखेर पर्यंत अनेक वेळा इचलकरंजीकरांना पाणी मीच देणार, सुळकूड योजनेची अंमलबजावणी मीच करणार’ अशा जाहीर घोषणा केल्या आहेत व आश्वासने दिली आहेत.
प्रत्यक्षात या प्रश्नी आवाडे यांच्याकडून वा त्यांच्यामुळे कांहीही घडलेले नाही. इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीला व शहरातील सर्व नागरिकांना जाहीररीत्या दिलेल्या आश्वासनांचा आवाडे यांनी भंग केला आहे.
राजकीय सोय व आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून आवाडे यांनी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. आवाडे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी आवाडे यांच्या निवासस्थानावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड संख्येने व महिलांनी मोकळ्या घागरीसह प्रचंड संख्येने सकाळी ठीक १० वाजता कॉ. के. एल. मलाबादे चौक, जनता बँकेजवळ जमावे असे जाहीर आवाहन कृति समितीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेले आहे.
प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस मदन कारंडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, पुंडलिक जाधव, प्रसाद कुलकर्णी,
कॉ. सदा मलाबादे, विकास चौगुले, वसंत कोरवी, बजरंग लोणारी, जाविद मोमीन, शिवाजी साळुंखे, प्रमोद खुडे, प्रकाश सुतार, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रिग्युस, ज्योत्स्ना भिसे, अवधूत वाडेकर, मुकुंद माळी, युवराज शिंगाडे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.