आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातून नेतेमंडळीची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये मा. आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील गावोगावी जाऊन गाव भेट दौरा सुरू केलेला होता आणि या गाव भेट दौऱ्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद देखील मिळालेला आपण पाहिलाच आहे. तर या गावभेट दौऱ्यामध्ये दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडे डोंगरगावच्या महिलांनी सांगोला जत एसटी सेवा सुरू करण्याची मागणी केलेली होती आणि हीच मागणी दीपक आबांनी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डोंगरगावातील नागरिकांना जत तालुक्याला कामानिमित्त तसेच रुग्णालयाला जाण्यासाठी सोनंद पर्यंतचा प्रवास करून तिथून दुसऱ्या गाडीच्या माध्यमातून जतला जायला खूप त्रास होत होता. त्याचवेळी डोंगरगावातील महिलांनी एकत्र येऊन सांगोला जत ही लालपरी डोंगरगाव मार्गे चालू करावी असे मुद्दे दोन-तीन वेळा पाठीमागे देखील मांडण्यात आले होते. या सर्व गोष्टींवरती पूर्वी काही ठिकाणी पत्र देऊन देखील गाडी सुरू करण्यात आली नव्हती.
त्याचबरोबर पाच ऑगस्ट 2024 रोजी दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्या दरम्यान डोंगरगाव नगरीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयश्रीताई पवार आणि महिलावर्गांनी पुढाकार घेऊन दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासमोर सांगोला जत मार्गावरील एसटी डोंगरगाव मार्गे सुरु करावी अशी मागणी केली होती आणि दीपक आबांनी तात्काळ जनतेच्या मागणीची दखल घेत या मार्गावर 19 सप्टेंबर 2024 रोजी पहिली लाल परी धावली. या निर्णयामुळे गावकरी वर्गातून दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आभार तसेच अभिनंदनचा वर्षाव होत आहे.