मंगळवेढ्यात उपसा सिंचन योजना राबविणार…….

मंगळवेढा तालुक्याला दुष्काळाचा लागला असला तरी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबवून हा कलंक आ. समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्याला खांदा लावून पुसला जाईल अशी ग्वाही लोकसभेची भाजपा उमेदवार आ.राम सातपुते यांनी लक्ष्मी दहीवडी येथे बोलताना व्यक्त केले.

आ. सातपुते म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत मोठ्या प्रमाणात प्रगतीची वाटचाल करीत असून 40 हजार कोटीचे महामार्ग या जिल्ह्यातून झाले आहेत,त्यातील काही रस्त्याची कामे सुरू आहेत तर काही रस्ते प्रस्तावि आहेत. महिलांना चुलीपासून धुर मुक्त करण्यासाठी उजाला योजनेतून जिल्ह्यात 2 लाख कुटूंबाला गॅस दिले. शौचालयासाठी स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधून दिले आहे तर गावातील प्रत्येक लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजनेतून कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे,काॅग्रेस सरकारच्या काळात लाभार्थीला एक रुपया निधी दिला की खाली 15 पैसे यायचे परंतु पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातून शेतकऱ्याच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये सोडले जातात आणि तितकेच खात्यावर जमा होतात. तर येणाऱ्या काळात मंगळवेढ्यात उपसा सिंचन राबवून दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार असे आश्वासन आ. राम सातपुते यांनी दिले.