महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच होणार जाहीर! केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्र दौऱ्यावर, 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद

राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार, यावर चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणाबरोबर होणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका पुढं ढकलल्या. यावरून महाविकास आघाडीने केंद्रातील आणि राज्यातील महायुती भाजप सरकारला वेळोवेळी आव्हान दिलं.

आता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. तसंच 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.केंद्रीय निवडणूक (Election) आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर असताना, राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष, अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन आढावा घेणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाचं चित्र स्पष्ट होईल.

तसंच निवडणूक कार्यक्रमांशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश देतील. केंद्रीय पथक दौऱ्यानंतर 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार असल्यानं, होणाऱ्या पत्रकार परिषदेकडं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोग प्रत्येक राज्याचा आढावा दौरा करते. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा असणार असून, त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.