ठाकरे गटाच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. लोकसभेसाठी एकीकडे भाजप आणि काँग्रेसच्या एकामागोमाग एक उमेदवार यादी जाहीर होत असताना ठाकरे गटाकूडून अजून एकही उमेदवार झालेला नाही. मात्र आज शिवसेना ठाकरे गटाकडून आज लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे.

ठाकरे गटाकडून 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येतील. कालच संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. तर दुसरीकडे शिंदे गटसुद्धा आज उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचं संजय मंडलिक यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरेल.महाविकास आघाडीमधील जागावाटप कधीपर्यंत होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगते आहे. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत.

काँग्रेसने यापूर्वी काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची यादी अद्याप जाहीर होणे बाकी आहे. शिवसेना ठाकरे गटाची यादी आज संध्याकाळापर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज संध्याकाळपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदावारांची नाव जाहीर केली जाऊ शकतात.