Bajrichi Khichdi : हिवाळ्यात बनवा पौष्टिक बाजरीची खिचडी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या

हिवाळ्यात तज्ज्ञांकडून बाजरी खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही बाजरीची भाकरी खाऊन कंटाळले असाल तर पौष्टिक बाजरीची खिचडी बनवा. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

Bajrichi Khichdi  : खिचडी हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. लहान मुलांसाठी आवर्जून पौष्टिक खिचडी बनवली जाते. तुम्ही तांदूळ आणि डाळ घालून अनेकदा खिचडी बनवली असेल पण हिवाळ्यात आरोग्यास फायदेशीर असणारी बाजरीची खिचडी बनवली आहे का? हिवाळ्यात तज्ज्ञांकडून बाजरी खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही बाजरीची भाकरी खाऊन कंटाळले असाल तर पौष्टिक बाजरीची खिचडी बनवा. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य :

  • बाजरी
  • मूग डाळ
  • जिरे
  • कढीपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • हिंग
  • हळद
  • मीठ
  • तूप
  • लसूण

कृती :

  • सुरुवातीला बाजरीचे भरड दळून आणा.
  • बाजरीच्या भरडीमध्ये पाणी घाला आणि भूसा आणि सालं वेगळी करा.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये मूग डाळ पाण्यात भिजवा.
  • एका कढईत तूप गरम करा
  • त्यात बारीक चिरलेले लसूण, जिरे, हिंग, कढी पत्ता, आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या.
  • हळद आणि चवीनुसार मीठ टाका.
  • त्यात बाजरीची बाजरीची भरड घाला आणि चांगले परतून घ्या.
  • पाणी टाकून बाजरीची भरड चांगली शिजू द्या
  • त्यानंतर त्यात भिजवलेली मूग डाळ टाका आणि आणखी एक ग्लास पाणी घालून पुन्हा शिजवा.
  • कोथिंबीर घालून गरमा गरम बाजरीची खिचडी सर्व्ह करा.
  • तुम्ही ही खिचडी कुकरमध्ये सुद्धा करू शकता.

हि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा.