कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमधील चांदीचा (Silver) व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात कोल्हापूर पोलिसांनी गुन्ह्याचा उलघडा केला असून भावानेच भावाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे ( वय 29 रा.पंचतारांकित एमआयडीसी गोकुळ शिरगांव, कोल्हापूर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये () एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी प्रविण सुकुमार हालुंडे (वय 28 रा. मानेनगर रेंदाळा वाळवेकर नगर हुपरी आणि आनंद शिवाजी लेमलापूरे (वय 22 रा. श्री चौक शिवाजीनगर हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) या दोघांना चोरीस गेलेले चांदी व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल सह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुढील तपास गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे करीत आहेत.
मयत ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे व त्याचा लहान भाऊ प्रविण सुकुमार हालुंडे यांची वडिलोपार्जीत मालमत्तेबाबत झालेल्या वाटणी वरुन वाद सुरु होता. पोलिसांनी हाच धागा पकडत तपास सुरु केला.
प्रविणला राहत्या घरातून ताब्यात घेत तपास केला असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. पथकाने खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.मयत ब्रह्मनाथ हा घरामध्ये कोणाचेही ऐकत नव्हता व वडिलोपार्जित व्यवसायाची चांदीचे दागिणे आपलेकडेच ठेवत होता.
वेळोवेळी मागणी करुनही तो परत देत नव्हता तसेच तो व्यवसायामध्ये अडथळा निर्माण करत होता आदी कारणामुळे प्रविणच्या मनात राग होता. त्यामुळे प्रविण व त्याचा मित्र आनंद शिवाजी सेमलापूरेनं भावाला संपवण्याचा निर्णय घेतला. ब्रम्हनाथ हालुंडे हा घरी एकटा चांदीचे काम करत असल्याची माहिती घेत आरोपी व त्याचा मित्र आनंद घरी गेले.
यावेळी भावांमध्ये वाद झाला.यावेळी प्रवीणने भावाला धरल्यानंतर आनंदने ब्रह्मनाथच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यानंतर घरामधील सर्व चांदी घेवून गेल्याची माहिती प्रवीणने दिली. दुसरा आरोपी आनंदला रायबागमधून ताब्यात घेण्यात आले. चोरी केलेली सर्व चांदी हस्तगत करण्यात आली आहे.