औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवठा करण्याच्या वर्चस्वातून काल, सोमवारी रात्री १० वा. गुंडाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून, पोटात बाटल्या खुपसून अज्ञात तिघांनी खून केला.विनायक महादेव बजयंत्री ऊर्फ कोरवी (वय ४२ रा. पाच तिकटी, हातकणंगले ) असे मृताचे नाव आहे. ही घटना इचलकरंजी रोडवरील रेल्वे भुयारी मार्गा शेजारील अध्यक्ष बिअर बारमध्ये घडली.
या घटनेचा गुन्हा रात्री उशीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.याबाबत हातकणंगले पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक कोरवी हा पोलिस रेकॉर्ड वरील आरोपी आहे. हातकणंगले परिसरा मध्ये त्यांची दहशत होती.
गावामध्ये त्यांची गावगुंड अशी ओळख होती. शहराच्या पूर्व भागात असलेल्या औद्योगीक वसाहत मध्ये तो कामगार पूरवठा करत होता. कामगार पूरवठयावरून त्यांची नेहमी दादागिरी होती. ती मोडून काढण्यासाठीच त्यांचा वर हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी रात्री १०वा त्याला मोबाईलवर फोन करुन अध्यक्ष बिअर बार मध्ये बोलावून घेण्यात आले होते.टेबलवर बसल्या नंतर आज्ञात तीन मारेकऱ्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांचे डोक रक्तबंबाळ केले. बिअरच्या बाटल्या फोडून त्यांच्या पोटात खूपसल्या मूळे तो जाग्यावरच कोसळला तेथेच मयत झाला.