आता राहुल गांधी येणार कोल्हापुरात! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आली आहे.देशाचे सहकार मंत्री अमित शाह बुधवार (ता.२५) कोल्हापुरात आले होते. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

दरम्यान, आज गुरुवारी (ता.२६) किंवा शुक्रवारी (ता. २७) खासदार राहुल गांधी यांचे पथक कोल्हापुरात येऊन पाहणी करणार आहे. कार्यक्रमस्थळ आणि परिसराची पाहणी करून सुरक्षा तैनात केली जाणार आहे. कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते श्री. गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी सर्व प्रकारची तयारी केली जात आहे.