आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त उद्या शुक्रवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी जवळे गावामध्ये रामोशी बेरड व बहुजन समाजाचे समाजसेवक राजाभाऊ गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दीपकआबा साळुंखे पाटील संचलित शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने आद्यक्रांतिवीर महापुरुष राजे उमाजी नाईक यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक नेते व सोहळ्याचे संयोजक राजाभाऊ गुजले यांनी दिलेली आहे.
जवळे गावांमध्ये सकाळी नऊ वाजता आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पवृष्टी करीत पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये युवानेते यशराज साळुंखे पाटील, आणि डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.