अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली आहे. महामंडळाचे १ लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती करण्यात आली आहे.आणखी मराठा उद्योजकांची संख्या वाढावी. उद्योग व्यवसाय वाढीस लागावेत. या दृष्टिने यानिमित मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा आणि पंढरपूर उपकेंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रमउद्या दि.२९ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ७ हजार २१३ लाभार्थी झाले असून, ८ हजार ९९० कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे.
त्यापैकी महामंडळाने ८६७ कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या बँकांचा सत्कार व तसेच नाविन्य पूर्ण व्यवसाय करर्णाया लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.दि. २९ रोजी मेळावा व पंढरपूर येथील उपकेंद्र उद्घाटनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. समाधान आवताडे, त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार उपस्थित असणार आहेत.उपकेंद्र उदघाटन सकाळी १० वा. हॉल क्र.७, इंदिरा गांधी चौक, शॉपिंग सेंटर, लोकमंगल बँकेच्या शेजारी पंढरपूर या ठिकाणी होणार आहे. तर मेळावा सकाळी १०.३० वाजता श्रीयश पॅलेस, कोर्टी रोड पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.