आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षातून नेतेमंडळींची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार याबाबतीत मात्र तर्कवितर्क अजून देखील लावण्यात येत आहेत. सांगोला विधानसभा मतदार संघात देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील गाव भेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
दीपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच पश्चिम बंगाल दौरा करून कलकत्ता येथे सांगोला तालुक्यातील शेकडो गलाई बांधवांशी संवाद साधलेला होता. आता तालुक्यातील नागरिक परराज्यातील व्यावसायिक यांच्यानंतर मुंबई आणि महानगरात पसरलेल्या व्यावसायिक उद्योजक आणि नोकरदारांशी दीपक आबा संवाद साधणार आहेत.