सोलापुरात यंदा खरिपाच्या पेरा वाढवण्याची शक्यता…

सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर आहे. गतवर्षी जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २१५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र, यंदा चांगला पाऊस पडण्याच्या शक्यतेने खरीपाच्या क्षेत्रात ३० हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता गृहित धरुन कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे.

सोलापूर जिल्हा हा मुख्यतः रब्बीचा आहे. तर गेल्या अनेक वर्षांत खरीप बाजरी, भुईमूग, कापूस आदी पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्याऐवजी सोयाबीन, तूर, उडीद, मका, भात आदी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या पिकामुळे पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २१५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र, यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यामुळे यंदा खरीपाच्या क्षेत्रात ३० हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात वाढ होऊन ती तीन लाख ७६ हजार ७२३ हेक्टरवर पोचण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांत खरिपात झालेल्या पेरणीनुसार यंदा त्याच्या क्षेत्रात वाढ होईल, असे गृहित धरुन कृषी विभागाने नियोजन केले आहे.