Gandhi Jayanti 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव काल, आज आणि उद्या

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी झाला होता, म्हणून दरवर्षी हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगातील अनेक देशांमध्ये गांधीजींच्या स्मरणार्थ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

सालाबादप्रमाणे यावर्षीही गांधी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात सगळीकडेच गांधी जयंती फार उत्साहात साजरी केली जाते.आज गांधी जयंती आहे.

सुमारे 155 वर्षांपूर्वी, जेव्हा गुजरातमधील पोरबंदर या छोट्याशा शहरात एका मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या नावाशी ‘महात्मा’ हा शब्द कायमचा जोडला जाईल, असे कुणालाही वाटले नसेल. ते मूल मोठे होऊन ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जाईल, याची कल्पनाही कोणी स्वप्नातही केली नसेल.

की सारे जग त्याला प्रेमाने ‘बापू’ म्हणेल. पण आज जगभरात महात्मा गांधीजींना त्यांच्या कार्यसाठी आणि त्यांच्या शिकवणीसाठी ओळखले जाते. पाश्चात्य देशातील मंडीळीही गांधीजींच्या विचारांचा आदर्श घेतात.