आटपाडी तालुक्यात ग्रामकर ॲप विकसित

आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाचीवाडी ग्रामपंचायतीने डिजिटल कर प्रणालीचा स्वीकार करत ग्रामकर ॲप विकसित केलेले आहे. गावातील नागरिकांना आता आपल्या करवसुलीसह तक्रार निवारण करण्यासाठी हायटेक यंत्रणा वापरता येणार आहेत.

तर नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारी पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी केले. या ॲपमध्ये कर वसुली, तक्रार व तक्रार निवारण, विविध योजनांची माहिती, मतदार याद्या, नवीन मतदार नोंदणी, विकास कामांची माहिती, थकबाकीदारांची यादी उपलब्ध होणार आहे.