शारदीय नवरात्रीची सुरूवात यंदा आज पासून होणार आहे. स्त्री शक्तीचा जागर करणारा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवसात नऊ रंग परिधान करण्याची महिलावर्गामध्ये विशेष क्रेझ असते.
नवरात्री 2024 मधील नऊ रंग कोणते?
तारीख वार रंग
दि.3 ऑक्टोबर गुरुवार पिवळा
दि.4 ऑक्टोबर शुक्रवार हिरवा
दि.5 ऑक्टोबर शनिवार करडा
दि.6 ऑक्टोबर रविवार केशरी
दि.7 ऑक्टोबर सोमवार पांढरा
दि.8 ऑक्टोबर मंगळवार लाल
दि.9 ऑक्टोबर बुधवार निळा
दि.10 ऑक्टोबर गुरुवार गुलाबी
दि.11 ऑक्टोबर शुक्रवार जांभळा
दि.12 ऑक्टोबर शनिवार मोरपिशी
शारदीय नवरात्री 2024 मुहूर्त
शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस हा घटस्थापनेचा असतो. या दिवशी महिला घरात घटाची स्थापना करतात. यामध्ये नऊ धान्यांचा समावेश असतो. प्रत्येक दिवशी एक नवी माळ लावली जाते. 3 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी घट स्थापन करण्याचा मुहूर्त सकाळी 06:15 ते 07:22 पर्यंत आहे. त्याच वेळी, अभिजीत मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवींना आवाहन करून 9 दिवस तिची पूजा केली जाते.
काही भक्त हे 9 दिवस अनवाणी चालतात. व्रत ठेवतात. केवळ फलाहार करतात आणि दसर्याच्या दिवशी व्रत सोडतात. टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. लेटेस्टली यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.