यंदाचा नवरात्र उत्सव सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास ! आज सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार ‘हा’ भत्ता…..

आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. आज घटस्थापना होईल आणि त्यानंतर पुढील दहा दिवस नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढत असतो.

जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढतो. यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढणार आहे. त्याबाबतचा निर्णय मात्र आज अर्थातच 3 ऑक्टोबर 2024 लावण्याची शक्यता आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता (DA) वाढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. यासह विद्यमान डीए 50% वरून 53% पर्यंत वाढेल.

ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार असून, याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारा सोबत म्हणजे जो पगार नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्यासोबत दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यानची 3 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.