हुपरी नवरात्रउत्सवात आजपासून प्रारंभ ….

हुपरी येथील ग्रामदैवत जगदंबा अंबाबाई देवीचे नवरात्रोउत्सव आज गुरुवार दि.3 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे . उत्सव काळात विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रमासह सामुदायिक चित्रपट देवीचे गोंधळ गीते, वाद्य -मुरळी, जोगतीन गीताबरोबरच संगीत महोत्सव ,अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री अंबाबाई देवी नवरात्रोत्सव समितीतर्फे देण्यात आली. आहे आज गुरुवार सकाळी 10 वाजता घटस्थापना करण्यात येईल. रोज संध्याकाळी 6.30 वाजता देवीला अभिषेक, सामुदायिक स्त्रोत पठण, दुपारी 12 वाजता धुपारती, त्यानंतर महिला भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होतील . असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.