गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त, 700 विद्यार्थ्यांचे क्षमता असलेली नवीन तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, इमारत पूर्ण होईपर्यंत अभ्यासिका व पुस्तके देव-घेव विभाग मंगलधाम येथे हलविण्यात येणार आहे. रवींद्रनाथ टागोर ग्रंथालयाचे 22 ऑगस्ट 1994 नगरविकास राजमंत्री अरुण गुजराथी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते .या ठिकाणी सध्या 350 विद्यार्थी बसण्याची क्षमता असून, पुस्तके देव – घेव विभाग, मुलींसाठी तीन मुलांसाठी दोन अभ्यासिका असून टेक्निकल विभाग गोडाऊन साठी प्रत्येक एक खोली आहे .
सुमारे आठ गुंठे क क्षेत्रामध्ये अभ्यासिका व पार्किंग सुविधा करण्यात आली होती. या ठिकाणी अभ्यास केलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. राज्य सरकारने मंजूर केलेल्या अडीच कोटी रुपयांच्या निधीतून वाचनालयाचा दुसरा मजला बांधण्यात येणार होता. त्यासाठी महानगरपालिकेकडुन इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केले .त्यामध्ये इमारत कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. सध्या आलेल्या अभ्यासिकेची क्षमता कमी पडत होती ,तसेच अनेक नवनवीन गोष्टी आवश्यक होती . या इमारतीमध्ये पुस्तक देव-घेव पेपर विभाग ,अभ्यासिका, स्वच्छतागृह, गेस्ट रूम, लेक्चरहॉल ,कॉन्फरन्स हॉल व लिफ्ट असणार आहे. नवीन इमारत बांधण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे .इमारतीची डिझाईन करण्याचे काम सुरू आहे .आता ग्रंथालय व अभ्यासिका मंगलधाम या ठिकाणी हलविण्यात येणार आहे.