सरकारकडून अनेक विकास कामांसाठी वारंवार निधी देण्यात येतात. हातकणंगले शहराला चार कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बहुजन समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नगर पालिका क्षेत्रामध्ये शिवराज्य भवन ही संकल्पना साकारली जाणार आहे.
पहिल्या टप्यात हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले, हुपरी पेठ वडगांव या ठिकाणी शिवराज्य भवन साकारणार असुन हातकणंगले येथील शिवराज्य भवनसाठी नगरविकास खात्याकडून चार कोटी रुपये मंजुर केले असुन त्याचे भुमिपुजन उद्या शुक्रवार ता. ८ मार्च रोजी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी व अजित पवार यांच्या उपस्थितत होणार असल्याची माहीती खास. धैर्यशील माने यांनी हातकणंगले येथे पत्रकार परिषदेत दिली. खास. माने यांनी सांगितले, पहिल्या टप्प्यात शिरोळसह मलकापुर नगर पालिका हद्दीतही शिवराज्य भवन साकारणार आहे.
शिवराज्य भवनमध्ये बहुजन समाजातील मुला मुलींना युपीएससी, एमपीएससीसह सर्वच क्षेत्रातील स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केले जाईल . या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने, नगरसेवक राजु इंगवले, प्रताप देशमुख, निशिकांत पाटील, पंडीत निंबाळकर, मंगेश देवाळे, दिपक कुन्नुरे भाऊसो फास्के, मुख्याधिकारी विशाल पाटील, नगरपंचायतीचे आधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते