आज महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. विश्वचषकातील भारतीय संघाचा हा पहिला सामना असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करुन स्पर्धेत विजयाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि न्यूझीलंडचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना असेल. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही या स्पर्धेतील पहिला सामना असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल.
सामना कधी आणि कुठे होणार?
महिला टी-20 विश्वचषक 2024 मधील (Womens T20 World Cup 2024) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शुक्रवार, 04 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय चाहत्यांना संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना थेट पाहता येणार आहे.
सामना कुठे बघाता येईल?
भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील सामना स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.