मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा! निकष, फायदे कोणते

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राकडून ही मागणी करण्यात येत होती.अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलायं. मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष निकष निश्चित करण्यात आले होते.

अभिजात भाषेच्या दर्जाचे निकष कोणते

1500-2000 वर्षापर्यंतची अगदी सुरूवातीच्या ग्रंथाची/अभिलिखित इतिहासाची अति प्राचीनता
भाषकांच्या पिढ्यांनी एक मौल्यवान वारसा म्हणून मानलेले प्राचीन साहित्य/ग्रंथाचा भाग
साहित्यिक परंपरा मूळ असावी आणि ती अन्य भाषक समाजाकडून उसनवारी केलेली नसावी
अभिजात भाषा व साहित्य हे अर्वाचीन साहित्यापेक्षा भिन्न असल्यामुळे अभिजात भाषा आणि नंतरची रूपे किंवा तिच्या उपभाषा यामध्ये खंड देखील असू शकेल.

कोणते फायदे मिळणार ?

भाषा समृद्धीसाठी केंद्र सरकारकडून २५० ते ३०० कोटींचे अनुदान
भाषेतील दोन विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार
सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना
भाषेच्या अभ्यासासाठी प्रत्येक विद्यापीठात विशेष केंद्राची उभारणी
भारतातील ४५० विद्यापीठांत मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था होणार.
प्राचीन ग्रंथांचा अनुवाद होणार