वर्षातला हा शेवटचा महिना. वर्ष संपण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. ३१ डिसेंबरपर्यंत काही आर्थिक कामे लवकरात लवकर पूर्ण करा.ऑनलाइन पेमेंट करण्यापासून ते बँकेशी संबंधित कामांपर्यंत अनेक कामे आहेत जी वेळेवर पूर्ण करायला हवी. ती कामे कोणती आहेत. ते जाणून घेऊया.
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर (Offer) देत आहे. त्याचे नाव आहे बीओबी के संग फेस्टिव्हल की उमंग. ज्याचा लाभ ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत घेता येईल. यामध्ये बँक ग्राहकांना अतिशय आकर्षक व्याजदरात कर्ज (Loan) सुविधा देत आहे. ऑफरअंतर्गत तुम्ही कार लोन, होम लोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनवर सणासुदीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैंकी (Bank) एक आहे. परंतु, यामध्ये अनेक योजना ऑफर करते. त्यापैकी एक अमृत कलश योजना आहे. एसबीआयची ही योजना मुदत ठेवींसाठी उपलब्ध आहे.
SBI ची अमृत कलश योजना ७.१० टक्के व्याजदराचा लाभ देते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी ३१ डिसेंबर २०२३ आहे.युनिक आयडेंटिफेकशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)च्या अधिकृत वेबसाइटनुसार गेल्या १० वर्षात आधार कार्डची माहिती अपेडट केली गेली नसेल, तर १४ डिसेंबरपर्यंत ते मोफतची सुविधा दिली जाते आहे. यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना ३० डिसेंबर २०२३ पूर्वी बँक लॉकर्ससाठी नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना ०.१७ टक्के प्रक्रिया शुल्कासह वार्षिक ८.४० टक्के दराने गृहकर्ज देते आहे.
बँकेकडून फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत गृहकर्ज दिले जात आहे. ज्याचा लाभ ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मिळणार आहे. ऑफर अंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर ०.६५ टक्के म्हणजेच ६५ बेस पॉइंट्सची सूट मिळेल.जर तुम्ही मागच्या वर्षभरात UPI ID वापरला नसेल. तर तुमचा UPI आयडी बंद होईल.
याची माहिती युजर्सना मेल आणि एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमचे डिमॅट खाते बंद होईल. त्यासाठी नॉमिनीचे नाव समाविष्ट करा. नॉमिनीसाठी व्यक्तीचे नाव डिमॅट खात्याशी जोडणे अनिवार्य आहे. हे काम ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल.