मोबाईल नंबर शेअर न करताच करता येणार चॅट!व्हॉट्सॲपचं भन्नाट प्रायव्हसी फिचर

व्हॉट्सॲप (WhatsApp) नवीन फिचर(New Feature) आणण्याच्या तयारीत आहे. आता व्हॉट्सॲप भन्नाट प्रायव्हसी फिचरवर काम करत आहे.

या नवीन फिचरमुळे व्हॉट्सॲप वापरताना तुमची सुरक्षितता वाढणार आहे. व्हॉट्सॲप एका फिचरवर काम करत आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबच तुमचा मोबाईल नंबर न देता चॅट करू शकता. व्हॉट्सॲपचे हे आगामी फीचर गोपनीयता राखण्यासाठीही मोठी मदत करणार आहे.जगभरात व्हॉट्सॲपचे एक अब्जहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युजर्सच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेते.

आता कंपनी प्रायव्हसी आणि कनेक्टिव्हिटीसंदर्भात एक नवीन फीचर आणणार आहे. यामुळे युजर्सला चॅट करण्यासाठी कुणासोबतही मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज पडणार नाही. विना मोबाईल नंबर शेअर करता तुम्हाला व्हॉट्सॲपवर चॅट करता येणार आहे.व्हॉट्सॲप एक नवीन फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फिचरचा वापर करुन युजर्सना फोन नंबर शेअर करण्याऐवजी यूजरनेम वापरून संबंधित व्यक्ती किंवा इतरांशी कनेक्ट करण्याची परवानगी मिळेल.

या फिचरवर सध्या काम सुरु आहे. युजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप हे फिचर लाँच करणार आहे. व्हॉट्सॲप सध्या इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एक मोठे आणि आघाडीचं व्यासपीठ बनलं आहे. जगभरात दोन अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सॲप वापरतात. यामुळे कंपनी युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी नवनवीन अपडेट आणत असते. यामुळे मेटा कंपनी लवकरच व्हॉट्सॲपच्या एका मोठ्या फीचरवर काम करत आहे.

वास्तविक, व्हॉट्सॲप सध्या ‘यूजरनेम’ या नवीन फीचरवर काम करत आहे. यासोबतच यूजर्सच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्च बार देखील उपलब्ध असेल ज्याद्वारे लोक मोबाईल नंबरशिवाय त्यांच्या यूजरनेमद्वारे इतर लोकांना शोधण्यास सक्षम असतील. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोकांना लवकरच व्हॉट्सॲपवर नवीन युजरनेम आयडी मिळेल.

युजरनेम फिचर सुरु झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणालाही शेअर करण्याची गरज भासणार नाही, हा सर्वात मोठा फायदा असेल. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची एक्सचेंज न करता कोणाशीही सहज संपर्क साधू शकाल.