देशांतर्गत शेअर बाजाराने आज ऑगस्ट महिन्याची चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी सेन्सेक्सनं (sensex) 82 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीही 25 हजारांवर गेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (Share Market) नवा इतिहास रचला गेला. कारण निफ्टीने 50 ने इतिहासात प्रथमच 25 हजार अंकांची पातळी गाठली आहे.
सुमारे 200 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स सकाळी 9.15 वाजता उघडला. निफ्टीने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आणि 76 अंकांच्या वाढीसह 25,027 अंकांवर उघडला. सुरुवातीच्या सत्रात बाजार उत्साही दिसत असून तेजीत सातत्याने वाढ होत आहे. व्यवहाराच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनेही नवा इतिहास रचला आणि पहिल्यांदाच ८२ हजारांचा टप्पा पार केला.