ऑनलाईन बुकिंगवर हॅकर्सचा डल्ला! 300-350 हॉटेल व्यावसायिकांचे बुकिंग प्रोफाईल हॅक

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याचा वापर सर्रास वाढला आहे. पण त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. आजकाल ऑनलाइन माध्यमातून लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असून हॅकर्स अनेकांना गंडा घालत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशाच हॅकर्सचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला असून हॉटेलच्या ऑनलाईन बुकिंगवरही हॅकर्सनी डल्ला मारला आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 300-350 हॉटेल व्यावसायिकांचे बुकिंग प्रोफाईल हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही हॉटेल्सनाही याचा फटका बसला आहे. या हॅकर्सनी डुप्लीकेट प्रोफाईलच्या माध्यमातून ॲडव्हॅन्स बुकिंग मिळवत हजारो रुपयांवर डल्ला मारल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

अनेक पर्यटक रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग येथे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असतात. मात्र काही हॅकर्सनी बुकिंग डॉट कॉम ही साईट हॅक करून ते त्या वेबसाइट्सचे मालक बनले आणि त्यांनी बनावट बुकिंग करत अनेक पर्यटकांना जाळ्यात अडकवले. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.

हॉटेलच्या ऑनलाइन बुकिंगचे हॅकिंग टाळण्यासाठी काय करावे, काय काळजी घ्यावी यासंदर्भात तज्ञ आणि कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्टचे जनरल मॅनेजर विजेंद्र सिंग यांनी काही सल्ले दिले आहेत.

हॉटेल व्यवसायिक आणि पर्यटकांनी यासंदर्भातील काळजी घ्यावी. हॉटेलचं बुकिंग डायरेक्ट केलं तर या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतील. हॉटेल बुकिंग झाल्यानंतर ओटीपीतून पेमेंट झालं की नाही याची खात्री रोज करून घ्यावी.

हॉटेलचं बुकिंग डायरेक्ट केलं तर या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतील. हॉटेल बुकिंग झाल्यानंतर ओटीपीतून पेमेंट झालं की नाही याची खात्री रोज करून घ्यावी. तसेच हॉटेलचं होणारं बुकिंग आणि पेमेंट याची खातरजमा हॉटेल व्यवसायिकांनी करावी. हॉटेल बुकिंग हॅक झाल्यामुळे एकाच रूमचं दोन ते तीन पर्यटकांना बुकिंग जाऊ शकतं. त्यामुळे दोन दिवसाआड एकाच नावावर रूमचं बुकिंग झाल्यास ते अकाउंट हॅक झाले असे समजावे.

अकाउंट हॅक झाल्यामुळे एकाच हॉटेलच्या रूमचं बुकिंग अनेक पर्यटकांना जाऊन गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यात आर्थिक नुकसान तर होतंच पण प्रत्यक्षात त्या जागी पोहोचल्यानंतरही जागेचा प्रॉब्लेम येऊ शकतो.