महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचं बिगुल वाजणार

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे, बैठका घेण्यात येत आहेत. राज्यात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत दाखल होऊन त्यांनी सर्व तयारीचाही आढावा घेतला.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचं बिगुल वाजणार असून महाराष्ट्रात लवकरच आचारसंहिता लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक आयोगाची प्रकिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या आठवड्यात कधीही निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी माहिती मिळत असून कधीही निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाईल.