मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून होणार सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल…..

मित्रांनो मार्गशीर्ष हा हिंदूसाठी पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात घट बसवला जातो. गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होणार आहे आणि किती गुरुवार महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे हे आपण जाणून घेऊयात.

पंचांगानुसार 12 डिसेंबरला संध्याकाळी 6.24 वाजता अमावस्या संपणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरूवात होणार असून 11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 वाजेपर्यंत असणार आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करायचं आहे.

मार्गशीर्ष गुरुवार 2023 व्रताच्या तारखा

पहिला गुरुवार – 14 डिसेंबर
दुसरा गुरुवार – 21 डिसेंबर
तिसरा गुरुवार – 28 डिसेंबर
चौथा गुरुवार – 4 जानेवारी

महालक्ष्मीचे व्रत कसे करतात?

मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घटस्थापना केली जाते. महालक्ष्मीच्या रूपाने घरोघरी घट बसवला जातो. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखट आणि पोशाख मिळतात. गुरुवारी पूजा करुन घटस्थापना केली जाते आणि हार आणि वेणी किंवा गजरा अर्पण करण्यात येते.

महिला या दिवशी दिवसभर उपवास ठेवतात आणि रात्री तो सोडतात. सकाळ संध्याकाळ घटाची पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिला हळदी कुमकुमचं आयोजन करतात. सवाष्ण महिलांना हळदी कुंकू आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन त्यांचा आशिर्वाद घेतात.

घट मांडणी कशी करावी?

घरातील फ्लोअर गोमुत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावं. त्यानंतर घट मांडण्याच्या ठिकाणी रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर लाल कपडा व्यवस्थितरित्या घाला. त्यावर तांदूळ ठेवून बरोबर मध्यभागी कळश ठेवावा.

कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. अंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. कळशाला चारही बाजून हळद-कुंकू लावावं. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसेच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे ठेवावे.