आजपासून पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागात कधीपर्यंत पडणार पाऊस?

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर पंजबराव डख यांनी शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद काढला आहे किंवा केला आहे, त्या शेतकऱ्यांनी ते झाकून ठेवावे, अन्यथा पावसाचा फटका बसू शकतो. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या या पिकांच्या काढणी सुरु आहेत. अशातच पाऊस आल्यास शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर 12 ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार असल्याचे डख म्हणाले. 12 ते 16 ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डखांमनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, परभणी,स हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे.