दिपकआबांच्या घोषणांनी दुमदुमला परिसर! सांगोला तालुक्यात दिपकआबाच आमदार व्हावेत महिला वर्गातून पाठिंबा…..

सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी तालुका पंढरपूर येथे कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोला आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भाळवणी येथे झालेल्या या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी दिपकआबांचे आगमन होतात औक्षण केले. तर दिपकआबांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. न भूतो न भविष्य अशा या कार्यक्रमासाठी भाळवणी आणि परिसरातून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तुफान कॉमेडी आणि उखाणे तसेच मनोरंजन यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. महिलांसाठी अशा पद्धतीने कार्यक्रम राबविण्यात यावेत यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यामध्ये या कार्यक्रमाचा हातभार लागला असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. यासह दीपकआबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.

होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या महिलेस पैठणी व नाकातील नथ बक्षीस म्हणून देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महिलेस एलईडी टीव्ही तर तृतीय क्रमांक पटकाविण्यात आलेल्या महिलेस आटाचक्की बक्षीस म्हणून संपादन करण्यात आले. चतुर्थ क्रमांक शिलाई मशीन तसेच उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

खेड्यापाड्यातील सामान्य महिलांना एक व्यासपीठ उभा करून देत महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला म्हणून माझा आबा सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात आमदार झाला पाहिजे असे म्हणून कमल यादव या वयोवृद्ध महिलेने अक्षरशः स्टेजवर जाऊन दीपक आबांची दृष्टच काढली.