सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक याबाबतीत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या सांगोला तालुक्यात देखील अनेक विकासकामे सुरु आहेत. सांगोला – पंढरपूर रेल्वे स्टेशन मधील सांगोला शहरातील महूद रोडवरील रेल्वे गेट क्रमांक ३१ हे दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी सांगोला शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन सीनियर सेक्शन इंजिनियर मध्य रेल्वे पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सांगोला शहरातील महूद रोडवरील रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद
