गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळवली होती त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून सात ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला आहे.यावरही निवडणुकीच्या तोंडावर हे स्टंटबाजी सुरू असल्याचे काही विरोधकांकडून म्हटले जात असताना कार्यक्रमानंतर आ समाधान आवताडे यांनी दोन दिवस मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठाण मांडून दुसऱ्या टप्प्याचे टेंडर ही काढले आहे.
या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे ७८ कोटी ४३ लाखाचे टेंडर काल दि.१० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले असून निविदा मागवण्यात आल्या आहेत त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेवर बोलणाऱ्या विरोधकांची बोलती बंद होत चालली आहे.आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांने पहिल्या टप्प्यातील कार्यारंभ व दुसऱ्या टप्प्याची निघालेली निविदा हे या दुष्काळी भागासाठी फार मोठा दिलासा देणाऱ्या घटना आहेत.