हुतात्माच्या इथेनॉल प्रकल्पाचे आधुनिकीकरण उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर

क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे आधुनिकीकरण कामाचा प्रारंभ उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच शनिवारी 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजता होत असल्याची माहिती चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली. कारखान्याच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही तर इतर उपपदार्थ निर्मिती करणे आवश्यक आहे. म्हणून कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पाचे आधुनिकीकरण करणेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे व दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करीत आहोत. तरी या कार्यक्रमास सर्व सभासद, शेतकरी, कार्यकर्ते, मान्यवर, हितचिंतक आणि उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.