Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात 13 किंवा 14 ऑक्टोबरला लागणार आचारसंहिता? शिवसेनेच्या नेत्याचे संकेत

राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल याची तारीख समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार १३ किंवा १४ तारखेला आचारसंहिता लागू शकते असं या नेत्यानं म्हटलं आहे.

शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहितेच्या तारखेबाबत सुतोवाच केलं आहे. त्यांनी म्हटलं की, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. राज्यात महायुतीची परिस्थिती भक्कम असून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. १३ किंवा १४ तारखेला राज्यात आचारसंहिता लागू होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.