सभा मुख्यमंत्र्यांची मात्र चर्चा ठाकरेंच्या पोस्टरची

शिवसेनेचे महाधिवेशन कोल्हापुरात पार पडत आहे. आज महा अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा कोल्हापुरातील गांधी मैदान येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

गांधी मैदानच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी उद्धव ठाकरे यांचं भलं मोठं पोस्टर उभं केलं आहे. हे पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.