भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने आतापर्यंत टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बुधवारी 15 जानेवारी रोजी श्रीलंकेचा पराभव करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात पाकिस्तानवर 12 जानेवारी रोजी विजय मिळवला. टीम इंडियाने पाकिस्तानला 109 धावांनी लोळवलं.
टीम इंडियाने यासह विजयी सलामी दिली होती. त्यानंतर 13 जानेवारीला इंग्लंडवर 29 धावांनी मात केली आणि सलग दुसरा विजय नोंदवला. तर आज 15 जानेवारीला श्रीलंकेवर 6 विकेट्स विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया चौथ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.टीम इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघ या स्पर्धेत पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत.
टीम इंडिया पाकिस्तानवर मात करत सलग चौथा विजय मिळवण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. तर पाकिस्तानचा गेल्या पराभवाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याच चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते.
इंडिया-पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल.
इंडिया-पाकिस्तान सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळेल.
इंडिया-पाकिस्तान सामना फॅनकोड एपवरुन मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.