मुकेश अंबानींची मागणी मोदी सरकारकडून अमान्य! एलन मस्कचा मार्ग सुकर, आता मिळणार स्वस्त इंटरनेट

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मागणी मोदी सरकारने अमान्य केली आहे. त्यामुळे टेसला मोटर्सचे संचालक एलन मस्क यांच्या कंपनीचा भारतातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.या निर्णयामुळे देशातील लोकांना स्वस्त इंटरनेट मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. एलन मस्क यांना भारतातील इंटरनेट क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी त्यांनी इंटरनेटसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव न करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप प्रशासकीय पद्धतीने केले जाणार आहे. दुसरकडे मुकेश अंबानी यांनी सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाच्या पद्धतीने करण्याची मागणी मुकेश अंबानी यांनी केली होती. परंतु सरकारने मुकेश अंबानी यांची मागणी नाकारत प्रशासकीय पद्धतीने स्पेक्ट्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत इंटरनेटच्या वापरात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीननंतर भारताचे मार्केट सर्वाधिक आहे.

तसेच 2030 पर्यंत हे मार्केट 16000 कोटींवर जाणार आहे. यामुळे भारतातील सॅटेलाइट इंटरनेटवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिओचे मुकेश अंबानी, भारत एअरटेलचे मित्तल आणि एलन मस्क यांच्यात स्पर्धा होती.एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंकने भारतात इंटरनेट क्षेत्रात गुंतवणुकीसाठी यापूर्वी अर्ज केला होता.

परंतु त्यावेळी दीर्घकाळानंतर काहीच निर्णय झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या कंपनीने माघार घेतली होती. आता त्यांची कंपनी उपग्रहामार्फेत इंटरनेट उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे केबलशिवाय जलद इंटरनेट शक्य होणार आहे. त्याचा फायदा भारतातील अनेक युजरला होणार आहे.