हातकणंगले विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी नऊ जणांनी नेले उमेदवारी अर्ज

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार सुरू आहे. अशातच कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. हातकणंगले विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी नऊ जणांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये दोन पक्षाचे उमेदवार तर सात अर्ज अपक्षांनी नेले आहेत. गणेश विलास वाईकर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने तर शिवाजी महादेव आवळे यांनी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने अर्ज नेले आहेत. अजित देवमोरे, संदीप कांबळे यांच्यासह सात इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर गुरुपुष्यामृत योग आहे आणि या दिवशी जास्त अर्ज भरले जातील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.