इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाकडून डॉ. राहुल आवाडे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते उद्या म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. आवाडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अशी महायुती आहे. डॉ. आवाडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या औचित्याने रॅली काढण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुतळा चौक येथून सकाळी नऊ वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे.
