लहान मुलांमध्ये पसरतोय ‘हॅन्ड फूट माउथ डिसीज’ लक्षणे कारण आणि काळजी जाणून घ्या….

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये हात-पाय-तोंड रोग अर्थात हॅन्ड-फूट-माउथ डिसीज होण्याचे प्रकार आढळून आले आहे. हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जो सहसा 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना संक्रमित करतो. परंतु, काहीवेळा मोठी मुले आणि प्रौढांना देखील याचा त्रास होऊ शकतो.

आजाराची लक्षणे

ताप येणे
घसा खवखवणे.
जीभ, हिरड्या, गालाच्या आतील भागात वेदनादायक पाणीदार फोड्या आणि जखमा तयार होतात.
तळवे आणि कधीकधी नितंबांवर पुरळ, पुरळ खाजत नाही, कधी कधी फोड येतात.
त्वचेच्या टोनवर अवलंबून लाल, पांढरे, राखाडी पुरळ.
लहान मुलांमध्ये खाण्याबाबत चिडचीड
भूक न लागणे.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर एखाद्याला संसर्ग झाला असेल तर त्याने इतर लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यापेक्षा एकांतात राहणे आवश्यक आहे. या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांची भांडी, कपडे व इतर वस्तू रोजच्या रोज वापरल्या जाव्यात. कोणीही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. कारण हा आजार एका मुलाकडून दुसऱ्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये पसरू शकतो. पूरळ पूर्णपणे बरी होईपर्यंत आणि किमान 24 तास ताप कमी होईपर्यंत पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.
कोणत्याही मुलास पुरळ उठण्याची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर मुलाला या आजाराची लागण झाली असेल तर त्यावर त्वरित उपचार करा. मुलाच्या आहाराची विशेष काळजी घ्या.