हुपरीत चिकनगुनिया, डेंग्यू रुग्णात वाढ; युवासेनेच्या वतीने निवेदन

हुपरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ वाळवेकर नगर, खेमलापुरेनगर परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डेंगू आणि चिकन गुण्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चाललेली आहे. ताप येणे, मळमळ, अंगदुखी, सांधेदुखी, चिकनगुनियाच्या व डेंगूचे रुग्ण हे भरपूर प्रमाणात आढळत आहेत. अजूनही काही भागांमध्ये गटारी नसल्याने गटारीत पाणी तुंबून डास व घाणीचे साम्राज्य वाढत आहे. नागरिकांना सणासुदीत दवाखान्यात ऍडमिट होणे अशा समस्यांना सध्या सामोरे जावे लागत आहे.

या आजारांवर काळा बसवण्यासाठी हुपरी नगर परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गटारींची स्वच्छता करून, धूर फवारणी, पावडर मारणे या उपायोजना कराव्यात अशा पद्धतीचे निवेदन युवा सेना शहरप्रमुख अजित रावसो उगळे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी सागर येवारे यांनी तातडीने उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले.