हातकणंगले तालुका विस्ताराने मोठा आहे. येथे खरेदी विक्रीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात. संपूर्ण तालुक्याचा भार एकाच कार्यालयावर असल्याने नागरिकांना 10 ते 15 दिवस अगोदर दस्त नोंदीसाठी नंबर लावावे लागत होते. याचा नाहक त्रास नागरिकांना होत असे यामुळे नागरिकांच्या पैशांचा व वेळेचा अपव्यय होत असे. त्यामुळे पेठवडगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे अशी मागणी होती. याची दखल घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जमिनी खरेदी विक्री, बँकेचे तारण, बोजा चढविणे, कमी करणे त्याचबरोबर अन्य कामांसाठी नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले होते.
Related Posts
हातकणंगले विधानसभा निवडणुकीत भाजपकडून भास्कर शेट्टे यांच्या नावाची जोरदार चर्चा
गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा…
उद्या आळतेत होणार संत सेना महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना!
हातकणंगले तालुक्यातील आळते येथे वार्ड क्रमांक ४ मध्ये उद्या सोमवार दिनांक ८ जुलै रोजी संत सेना महाराज व विठ्ठल रुक्मिणी…
मंडलिक, मानेंकडून प्रचार सुरू…
पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत गेले महिनाभर चर्चा सुरू आहे. मंडलिक आणि माने…