हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टींनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार नसल्याचे स्पष्ट दिसते. शेट्टींच्या भरवशावर असलेल्या महाविकास आघाडीला आता स्वतंत्र उमेदवार उभा करावा लागेल.ऐन निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेकडे ताकदवान उमेदवार नसल्याने प्रतीक हेच मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीचे माजी खासदार शेट्टी (Raju Shetty) यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा जोडण्यास सहमती दर्शवली.
शेट्टींसाठी काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री सतेज पाटील प्रयत्नशील होते. शेट्टींचा महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रवेशाचा मुहूर्त लवकरच होईल, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात शेट्टी यांच्याकडून आघाडीच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही.