दिवाळीनिमित्त किती दिवस राहणार बँका बंद? त्यापूर्वीच करून घ्या सर्व नियोजन

काही दिवसांवर दिवाळी आल्याने अनेक लोक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांमध्ये जातात. यासाठी बँकामध्ये मोठी गर्दी देखील जमते. या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.मात्र दिवाळीनिमित्त बँकांना काही दिवस सुट्टी असणार आहे. त्यापूर्वीच बँकेसंदर्भातील तुमच्या कामाचे नियोजन करून घ्या.

यंदा दिवाळी 28 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या दिवशी वसूबारस असून 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी असणार आहे. तर 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे. या तिन्ही दिवशी महाराष्ट्रात बँका बंद नसणार आहेत. मात्र काही राज्यांमध्ये 31 ऑक्टोबर सुट्टी देण्यात आली आहे.31 ऑक्टोबरला दक्षिण भारतासह उत्तर भारतातील बँकांना सुट्टी आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 31 ऑक्टोबरला सुट्टी असेल. तर त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, मेघालयमध्ये 31 ऑक्टोबरला सुट्टी नसेल.दरम्यान, 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर रविवार असल्याने बँका सलग चार दिवस बंद राहतील. मात्र महाराष्ट्रातील बँका 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबरला सलग तीन दिवस बंद असतील.