आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 90 कोटी 74 लाखांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Assembly General Election) साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे , दारू , ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, त्यापैकी गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.