सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी गुरुपुष्यामृत योग साधत दिग्गज उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. सांगलीतून भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेतून पालकमंत्री सुरेश खाडे, इस्लामपुरातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, याच मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, तासगाव – कवठेमहांकाळमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील, जतमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत, खानापूर-आटपाडीमधून शिवसेना शिंदे पक्षाचे सुहास बाबर, पलूस-कडेगावमधून भाजपतर्फे संग्रामसिंह देशमुख यांनी मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केले.
Related Posts
गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा! कोण आहे घायाळ करणारी नृत्यांगणा?
सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलला टस्सल देण्यासाठी नवी नृत्यांगणा यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात…
आता मिसकॉलशिवाय गॅस सिलिंडरचे होणार नाही बुकिंग
गॅस सिलिंडर हा गृहिणीचा दैनंदिन गरजेचा महत्वाचा भाग आहे. मिसकॉलशिवाय आता घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग होणार नाही. कोणतीही पूर्वसूचना न…
ब्रेकिंग! भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, २० प्रवासी जखमी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या (Palghar) मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा…