इचलकरंजी मतदारसंघावर देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे या जागेसाठी देखील जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाला असून पक्षाने मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे हे दोघेही महाविकास आघाडीमध्ये आहेत. तेव्हा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नसली तरी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढविण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
