इचलकरंजीत नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन

पंचगंगा नदीतून आठवड्यानंतर पुन्हा काल सकाळपासून पाणी उपसा सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीतून उपसा करण्यात येणाऱ्या पाण्यावर महापालिकेने आवश्यक ती प्रक्रिया केली आहे. तथापि, वळीव पावसामुळेही नदीपात्रात नवीन पाणी आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.